ललित गांधींचा शेतकरी कायद्यासंबंधी जनजागृतीचा वेगळा प्रयोग

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

शेतकरी कायद्यामुळे देशभरातील शेतकरी आनंदित झाले असले, तरी काही संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत व आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कोल्हापूर : शेतकरी कायद्यामुळे देशभरातील शेतकरी आनंदित झाले असले, तरी काही संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत व आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोल्हापूरचे उद्योजक व विविध व्यापार संघटनांचे नेते ललित गांधी यांनी या कायद्यासंबंधी जनजागृतीचा वेगळा प्रयोग केला आहे. 

ललित गांधींच्या द्वितीय कन्या भक्ती गांधी यांचा विवाह त्यांनी २४ डिसेंबर या दिवशी आयोजित केला आहे. विवाहाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २३ रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन असल्याने शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ एका विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता या कायद्याविषयी जनजागृती करणारा एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या जीवनात या कायद्याने आमुलाग्र बदल घडवू पहात असल्याने व्यापाराबरोबरच गेली ३० वर्षे पारंपरिक शेती करणाऱ्या ललित गांधी यांचा हा आगळा प्रयोग उपस्थितांना आनंददायी ठरेल, असा विश्‍वास गांधी कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. अनोखा प्रयोग केला जाणारा हा विवाह समारंभ मडगावमधील हॉलिडे इन रिसॉर्टमध्ये होणार आहे.

आणखी वाचा :

मांस पुरवठ्यावरून हिंदूत्ववादी संघटनानकडून सरकारची कोंडी

 

संबंधित बातम्या