लासलगावातील कांदा बांगलादेशात

Dainik Gomantak
शनिवार, 9 मे 2020

भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशासह जागतिक बाजार पेठेत कांद्याची मागणी घटल्याने कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आता आल्याने कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात नाफेड मार्फत केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ग्राहकांच्या हितासाठी 50 हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी सुरू केली आहे.

लासलगाव

लासलगाव येथील मध्य रेल्वेच्या स्थानकातून 42 बोगीतून 1750 मेट्रिक टन कांदा बांगलादेशात जाण्यासाठी मालगाडीत लोड केला जात आहे. येणाऱ्या दिवसात अशी निर्यात सुरू राहिल्यास कोसळते कांद्याचे बाजार भाव स्थिर राहण्यासाठी मदत मिळणार आहे. कांद्याला 500 पासून 900 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्याचा झालेला खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. अशात कांद्याची निर्यात जोमाने झाल्यास समाधानकारक भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशासह जागतिक बाजार पेठेत कांद्याची मागणी घटल्याने कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आता आल्याने कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात नाफेड मार्फत केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ग्राहकांच्या हितासाठी 50 हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी सुरू केली आहे. मात्र, कांद्याचे बाजार भावात कुठलही मोठी वाढ झालेली नाही. त्यात बांग्लादेशातून अचानक कांद्याची मागणी वाढल्याने कोलकाता येथील व्यापाऱ्यांनी 1750 मेट्रिक टन कांदा विकत घेतला. मात्र हमाल आणि ट्रक न मिळाल्याने व्यापाऱ्यांच्या गुदामात पडून होता. आता ट्रक आणि हमाल उपलब्ध झाल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून विकत घेतला असून तो कांदा मध्यरेल्वेच्या लासलगाव, निफाड, खरेवाडी, मनमाड आणि नांदगाव या पाच स्थानकातून मालगाडीत लोड केला जात आहे.

संबंधित बातम्या