महाराष्ट्राच्या मदतीसाठी सरसावल्या लता मंगेशकर

महाराष्ट्राच्या मदतीसाठी सरसावल्या लता मंगेशकर
Lata Mangeshkar donated Rs 7 lakh to help Maharashtra

महाराष्ट्रात कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती गंभीर बनली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. सुरुवातीला 15 दिवसांसाठी लागू करण्यात आलेला हा लॉकडाऊन अजून वाढवण्यात आला असून 15 मे पर्यन्त महाराष्ट्रात लॉकडाऊन असणार आहे. राज्यातील कोरोना महामारीमध्ये मदत म्हणून राज्यातील अनेक दिग्गज मंडळी समोर येताना दिसता आहेत. त्यातच आता देशाची गाणकोकिळा अशी ओळख असणाऱ्या लता मंगेशकर देखील महाराष्ट्राच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.( Lata Mangeshkar donated Rs 7 lakh to help Maharashtra)

संपूर्ण देश कोरोना (Corona) महामारीशी लढत असून, महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली आणि काही राज्यांत कोरोनामुळे गंभीर चित्र निर्माण झाल्याचे समोर आलेल्या आकडेवारीमधून दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर  ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर महाराष्ट्रातील कोरोना महामारीची परिस्थिती पाहता मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. लता मंगेशकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 7 लाख रुपयांची मदत दिल्याची माहिती मिळते आहे.  मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी सामाजिक भान जपत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत केल्याचे सांगितले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीमध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान,  यापूर्वी बॉलिवूडचा प्रसिद्ध कलाकार सलमान खान, सोनू सूद, भूमि पेडणेकर, रविना टंडन, गुर्मीत चौधरी, हर्षवर्धन राणे, विनीत सिंह आणि पंकज त्रिपाठी या सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील कोरोना विरोधात लढण्यासाठी आपापल्या परीने मदत केली असल्याचे पाहायला मिळते आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com