कोरोनाला रोखण्यासाठी लातूर मनपाची राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Latur Municipal Corporations best performance in the state to prevent corona
Latur Municipal Corporations best performance in the state to prevent corona

राज्यात कोरोनाच्या पहिल्या(Covid 19) लाटेत लातूर महानगरपालिकेने(Latur Municipal Corporation) योग्य नियोजन करत रुग्ण वाढू नयेत यासाठी योग्य ती दक्षता घेतली. पहिले काही महिने एकही कोरोना रुग्ण न आढळणारी लातूर महानगरपालिका अशी लातूर मनपाची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोना रुग्ण आढळले तरी काटेकोरपणे राबवलेल्या उपाययोजनांमुळे ही लाट आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली होती. तसेच राज्यात(state) आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महानगरपालिकेने उत्तम कामगिरी केली. मागील पाच दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रात 40 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लातूर मनपाने उत्कृष्ट काम केल्याचा दावा केला जात आहे. (Latur Municipal Corporations best performance in the state to prevent corona)

सध्या लातूर मनपा कोविड केअर केंद्रामध्ये बहुतांश खाटा रिक्त राहत आहेत. घटलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे  मनपाचे कोविड केअर सेंटरच्या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. मागील महिन्यापासून बाधित कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या लातूर शहरात वाढत आहे. लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालकमंत्री, प्रशासकिय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच लातूरच्या नागरिकांना याचे श्रेय दिले आहे.

म्युकरमायकोसिसवर (Mucormycosis) उपचार करण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जिल्ह्यातील तीन रुग्णालयात म्ययुकोरमायसिस वर उपचार देण्यात येत आहे. त्याचबरोबर तीन रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना उपचाराकरिता आवश्यक असणारे 'अम्फोटेरिसिन बी' हे इंजेक्शन मोफत दिले जात आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजतेनील लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com