Marathi Sahitya Sammelan: साहित्यिकांचे प्रखर विचार मान्य करावेत : गडकरी

अ. भा. साहित्य संमेलनाचा समारोप ः साहित्य निर्मितीला तंत्रज्ञानाची जोड देण्याचा सल्ला
Marathi sahitya sammelan
Marathi sahitya sammelanDainik Gomantak

‘साहित्यिक आणि राजकारण्यांमध्ये मतभेद असू शकतात. मात्र, मनभेद निर्माण व्हायला नकोत. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट आहे. साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचे काम केले. समाजाला दिशा दिली. जे साहित्य चांगले आहे ते त्रिकालवादी सत्य आहे.

देशामध्ये लोकशाही अस्तित्वात असल्यामुळे साहित्यिकांनी प्रखरपणे आपले विचार मांडायला हवेत आणि राजकारण्यांनी ते मान्य करायला हवेत,’ असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी खुले अधिवेशन आणि समारोप सत्रात गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदी उपस्थित होते.

साहित्य निर्मितीला तंत्रज्ञानाची जोड देण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला. ते म्हणाले, ‘येणाऱ्या काळात आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर आपल्या पिढीला कोणता विचार, तत्वज्ञान मिळते, त्यावर लक्ष द्यायला हवे. डोळे दान केले जाऊ शकतात. मात्र, दृष्टी दान केली जाऊ शकत नाही.

साहित्यिकांमध्ये समाजाला जीवनदृष्टी देण्याची ताकद आहे. त्यासाठी प्रकाशकांनी पुस्तके भविष्यामध्ये काढतच राहायला हवीत. मात्र, काळाच्या ओघात पुढील पिढी त्यात स्वारस्य घेत नाही, दुर्दैवाने ते सत्य आहे.

त्यामुळे, साहित्यनिर्मिती करताना तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला हवा. आजच्या तरुणांची आवड वेगळी आहे. ही बाब लक्षात घेत येणाऱ्या काळात जनरेशन गॅप लक्षात घेत साहित्य, काव्य आणि सादरीकरणात खूप बदल करण्याची गरज आहे.’’

खर्च कमी हवा

संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर समारोपीय भाषणात म्हणाले, की साहित्य संमेलने जितक्‍या कमी खर्चामध्‍ये करता येतील तेवढी ती केली पाहिजे. साहित्यामुळे एकमेकांना भेटण्‍याची, विचारांचे आदान-प्रदान करण्‍याची संधी प्राप्‍त होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com