महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लागू होऊ शकतो लॉकडाऊन

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

महाराष्ट्रात दिवसागणिक वाढत जाणारे कोरोना रुग्ण आणि त्यामुळे आरोग्य व्यस्थेवर पडलेला ताण पाहता महाराष्ट्रात लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात येते आहे.

देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या काही प्रमुख राज्यांपैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात दिवसागणिक वाढत जाणारे कोरोना रुग्ण आणि त्यामुळे आरोग्य व्यस्थेवर पडलेला ताण पाहता महाराष्ट्रात लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात येते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कधीही लॉकडाऊन लागू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. (Lockdown may be implemented in Maharashtra soon)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी, महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना महामारी मुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता लवकरात लवकर लॉकडाऊन (Lockdown) लावावा लागणार असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तयारी आम्ही करत आहोत, तसेच लॉकडाऊनबद्दलचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी माहिती दिली. तर दुसरीकडे राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत मोठा राजकीय संघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे.

भारतीय जनता पक्षासह अन्य विरोधी पक्ष राज्यात संपूर्ण लॉकडाऊनला विरोध करत असताना, राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊन केले तेव्हा त्यांनी कोणाचा सल्ला घेतला नाही किंवा कोणाच्या खात्यावर पैसे पाठवले नाहीत, त्यामुळे अशा परिस्थितीत असे प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार भाजपाला नाही. केवळ राजकारणासाठी अशी मागणी ठेवणे योग्य नाही,' असे सांगितले आहे. 

दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने, राज्यात लॉकडाऊन लावायचा असल्यास आर्थिक मदत केली गेली पाहिजे अशी सरकारकडे केली आहे. लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने अनेक परप्रांतीय मजुरांनी आपापल्या राज्यांकडे जाण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. 

संबंधित बातम्या