कृपया लक्ष द्या; मध्य रेल्वेने मुंबई ते गोवा दरम्यान जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत

Lockdown Central Railway has canceled trains from Mumbai to Goa
Lockdown Central Railway has canceled trains from Mumbai to Goa

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि वाढत्या रूग्णसंख्येचा अंदाज घेत महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. राज्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले आले आहे. त्याच बरोबर गोवा सरकारनेही कोरोनाव्हायरसा वाढता कहर बघता बुधवारी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे.(Lockdown Central Railway has canceled trains from Mumbai to Goa)

29 एप्रिल ते 3 मे म्हणजेच 5 दिवस गोव्यात लॉक़ाउन असल्याने गोवा बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. या आधी कर्नाटक, दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि आता महाराष्ट्रामध्येही लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. दरम्यान गोव्यासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्या सेंट्रल रेल्वेने(Central Railway) रद्द केल्या आहेत.

गोव्यातून कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या आणि आणि गोव्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतुकीच्या सुविधां सुरू राहणार आहे. मात्र अशातच मध्य रेल्वेने CSMT-करमाली तेजस एक्सप्रेस(CSMT karmali Tejas) आणि LTT-मंगलोर एक्सप्रेस(LTT Mangalore) रद्द केल्या आहे. दक्षिणेकडील राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे, त्यामुळे मध्ये रेल्वेने या प्रायमरी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातही लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे LTT-मंगलोर एक्सप्रेससह मुंबईहुन दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. राज्यातील लॉकडाउनची परिस्थिती बघता मुंबई आणि गोवा दरम्यान जाणाऱ्या गाड्या सेंट्रल रेल्वेने रद्द केल्या आहेत. लॉकडाउन दरम्यान गोव्यातील स्थानिक सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. मात्र कर्मचारी वर्गाला गोव्यात येतांना RT-PCR टेस्ट करणे गरजेचं असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com