राज्यातील लॉकडाऊन होणार शिथिल, निर्णय मात्र 2 दिवसांत

राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये(Lockdown) काही शिथिलता आणली पाहिजे यासाठी आम्ही अहवाल सादर केला आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे
राज्यातील लॉकडाऊन होणार शिथिल, निर्णय मात्र 2 दिवसांत
Lockdown in the state will be relaxed, but the decision will be made in 2 daysDainik Gomantak

राज्यात सध्या बऱ्याच जिल्ह्यात कोरोना(COVID-19) रुग्णांची रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे,त्यातच आता राज्यातला लॉकडाऊन(Lockdown) शिथिल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे कालच राज्यातील 14 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होंणार अशी मिळत होती त्याचसंदर्भांत आज मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली. मात्र या बैठकीतही काही ठोस निर्णय झाले नसल्याचे समोर येत आहे.कारण राज्यातले निर्बंध शिथिल करण्याबाबत 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगिलते आहे.(Lockdown in the state will be relaxed, but the decision will be made in 2 days)

आज झालेल्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली पाहिजे यासाठी आम्ही अहवाल सादर केला आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे .तसेच ते म्हणाले की, राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील तसेच शनिवारीही काही प्रमाणात शिथिलला देता येईल की याचा विचार देखील चालू असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. (Maharashtra Lockdown)

Lockdown in the state will be relaxed, but the decision will be made in 2 days
कोकणासह, संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भागात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता

तसेच ज्याची वाट मुंबईकर पाहत आहेत त्या लोकलबद्दल अद्यापही निर्णय होऊ शकला नाही, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची सुट द्यायची का याबातही रेल्वे बोर्डासोबत चर्च चालू असून त्याबद्दल लवकर निर्णय जाहीर करू असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

परंतु आता राज्यातील २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्प्ष्ट केले आहे ज्या जिल्ह्यातील पॉजिटिव्हिटी रेट कमी आहे अशा जिल्ह्यांना काही प्रमाणात सूट देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद जालना, हिंगोली, औरंगाबाद आदी जिल्ह्यांचा समावेश आहे

मात्र ११ जिल्ह्यांना अद्याप कुठलीही सूट देण्यात येणार नाही असेही त्यांनी स्प्ष्ट केले आहे.म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम असणार आहेत.

नेमके कोणते निर्बंध होणार शिथिल -

- शनिवार-रविवार लॉकडाऊन नसणार.

- शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल.

- थिएटर्स, व्यायामशाळा यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळू शकते.

- दुकान हॉटेल्स रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याचा विचार.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com