महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यांमध्ये पुन्हा होणार लॉकडाऊन?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

सरकारला आपरिहार्यतेने लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असं अजित पवार म्हणाले. परत लॉकडाऊन झाला, तर ते कोणालाच आवाडणार नाही, त्यामुळे सर्व नियमावलीचं पालन करणायचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. 

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाव्हायरस प्रकरणे सतत वाढत राहिल्यास सरकार कडक कारवाई करू शकते असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कालच केलं होत. याच पार्श्वभूमीवर आज नागरिक कोरोना नियमांचं पालन करत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिक अजूनही सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे हे नियम पाळत नसल्याचं ते म्हणाले. जर नियमांचं हे उल्लंघन असंच सुरू राहिलं, तर सरकारला आपरिहार्यतेने लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असं अजित पवार म्हणाले. परत लॉकडाऊन झाला, तर ते कोणालाच आवाडणार नाही, त्यामुळे सर्व नियमावलीचं पालन करणायचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. 

राज्यात मुंबईच्या तुलनेत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असून, परिस्थइती हाताबाहेर जाण्याआधी सरकार कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लॉकडाऊन संदर्भात प्रश्न विचारला असता, आज मुख्यमंत्री आरोग्या विभागा व इतर प्रमुख आधिकाऱ्यांची बैठक घेऊन, राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढवा घेणार असल्याचं ते म्हणाले. 

महारष्ट्रातील यवतमाळ, अकोला, अमरावती या शहरांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊनवर चर्चा केली जाणार आहे. याआधीच जालना, वाशिम,अकोला, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या