महाराष्ट्रात पूढील तीन  आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागण्याची शक्यता  

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा  एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा  एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  याबाबत आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. (Lockdown likely in Maharashtra for next three weeks) 

Sachin Vaze Case: सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकार व अनिल देशमुखांना मोठा धक्का

दरम्यान, महाराष्ट्रात काल दिवसभरात 56 हजार 286  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासात 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  तर काल 36 हजार 130 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आतापर्यंत  राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 82 हजार 191 इतकी झाली आहे. तर सध्या महाराष्ट्रात 5 लाख 21 हजार 317 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.  रुग्ण बरं होण्याचे प्रमाण 82.05 टक्के इतके आहे. तर राज्यातील मृतांचा आकडा 57 हजार 028 वर पोहोचला आहे.  सध्या 27 लाख 2 हजार 613 जण होम क्वॉरन्टीन असून 22 हजार 661 जण इन्स्टिट्यूशनल विलगीकरणात आहेत. 

'देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का...

तथापि, आज झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत  माहिती दिली आहे.  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावणे आवश्यक आहे. येणाऱ्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक  निर्णय घेण्यात येईल.   तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी, या मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. 

त्याचबरोबर, 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षाही पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर ही परीक्षा भविष्यात कधी आणि केव्हा होईल. याबाबतचा निर्णयही नंतर घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग पाहता राज्यातील सर्व सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डासह केंद्र सरकार विविध परीक्षाही पुढे ढकलण्यातची मागणी महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला केली जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. 
 

संबंधित बातम्या