मोठी बातमी : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन; तर अन्य ठिकाणी निर्बंध लागू

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्रातील अमरावतीत पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. अमरावतीचे जिल्हा अधिकारी शैलेश नवल यांनी आज याबाबतची घोषणा करताना, शनिवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाउन राहणार असल्याचे सांगितले. तर महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले नसले तरी, अनेक निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

Farmer protest : ’आम्ही शेतीही करु आणि आंदोलनही सुरु ठेऊ’

अमरावतीमध्ये संपूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, यवतमाळमध्ये मात्र कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये या महिन्याच्या अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याशिवाय, हॉटेल्स फंक्शन हॉल आणि लग्न समारंभाच्या ठिकाणी 50 टक्क्यांपर्यंत उपस्थितीची मर्यादा राहणार आहे. या व्यतिरिक्त 5 किंवा अधिक जणांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी एमडी सिंह यांनी आज कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाउन करण्यात येणार नसल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. 

दरम्यान, महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. काल राज्यात 4,787 कोरोना संक्रमित आढळले होते. त्यामुळे ही संख्या 2021 मधील एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या बाधितांमध्ये सर्वाधिक आहे. आणि काल अमरावतीत सगळ्यात जास्त 230 कोरोनाची नवी प्रकरणे समोर आली होती. तर मंगळवारी 16 तारखेला 82 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याव्यतिरिक्त, अकोला नगर निगम मध्ये काल 105 आणि मंगळवारी 67 कोरोना संक्रमित आढळले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.        

संबंधित बातम्या