युपीएससीच्या परीक्षेला अनुपस्थितीचा संसर्ग !

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

युपीएससीच्या परीक्षेला यंदा अनेक विद्यार्थ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून आली. राज्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील केंद्रांवर युपीएससीची परीक्षा मात्र सुरळीत पार पडली

पुणे - लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेल्या जीवनशैलीमुळे युपीएससीच्या परीक्षेला यंदा अनेक विद्यार्थ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून आली. राज्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील केंद्रांवर युपीएससीची परीक्षा मात्र सुरळीत पार पडली. शहरात सकाळी ९:30 ते ११:३० आणि दुपारी २:30 ते ४:30 या दोन सत्रांमधाये परीक्षा घेण्यात आली.

 ही परीक्षा पुढे ढकलण्यास  यावी, यासाठी काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या परीक्षेवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट होते. परंतु, न्यायालयाचा आदेश न आल्यामुळे परीक्षा झाली. परंतु, यंदा नोंदणी करूनही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढल्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. सुशील बारी यांनी सांगितले. 

का वाढली अनुपस्थिती?

१ कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने परीक्षेसाठी शहरात आलेले बहुसंख्य विद्यार्थी आपापल्या गावी परतले. 

२ गावाकडे गेल्यावर अनेक विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्याची चणचण भासू लागली. तसेच पोषक वातावरणाचाही अभाव होता. 

३ आयोगाने विद्यार्थ्यांना लांबचा  प्रवास करायला लागू नये, यासाठी परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती. पण महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे परीक्षा केंद्रे होती. गावाकडे गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ही केंद्रे लांब पडत होती.

४ दूरवरील केंद्रांवरील पालकांनी परीक्षेला न पाटविण्याची भूमिका घेतली. त्याचा फटका मुलींना बसला. 

५ अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा घट झाली.   

संबंधित बातम्या