ठाण्यात धार्मिक स्थळापासून 200 मीटरपर्यंत लाऊडस्पीकर वापरास बंदी

धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांवरून पुन्हा आरोप - प्रत्यारोप सुरु
ठाण्यात धार्मिक स्थळापासून 200 मीटरपर्यंत लाऊडस्पीकर वापरास बंदी
LoudspeakerDainik Gomantak

ठाणे : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत पुन्हा एकदा भोंगा आणि हनुमान चालीसा या मुद्यावरुन राज्य सरकारला सुनावलं असून राज्यसरकारने याबाबत ताडीने निर्णय घ्यावा अन्यथा समाजात तेढ निर्माण शक्यता आहे. असे ही राज ठाकरे म्हणाले. याच मुद्यावरुन मोठे वादंग सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी धार्मिक स्थळापासून २०० मीटरपर्यंत लाऊडस्पीकर वापरास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. (Loudspeaker usage banned up to 200 meters from religious places in Thane)

ठाणे पोलिसांनी शहरातील ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदारांना ध्वनिक्षेपक तसेच त्यासंबंधीचे साहित्य खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची वैयक्तिक माहिती घेऊन जवळील पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोणत्याही धार्मिक स्थळापासून २०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, घोषणाबाजी, गायन, वाद्य वाजविणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणूका आणि सभा घेण्यास २७ जूनपर्यंत ठाणे पोलिसांतर्फे बंदी घालण्यात आली आहे.

ठाणे आयुक्तालयाने आपल्या क्षेत्रातील सर्व ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदार, आस्थापना यांनी त्यांच्याकडून ज्या ग्राहकाने ध्वनिक्षेपक किंवा त्या संबंधीचे साहित्य खरेदी केले असेल त्या संबंधित व्यक्तीची माहिती जवळील पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये विक्रेत्यांना ध्वनिक्षेपक खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे नाव, पत्ता, ओळखपत्र, आधारकार्ड, संपर्क क्रमांक, वीज देयक याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.