खट्टू होऊन प्रियकर घाटातून माघारी

खट्टू होऊन प्रियकर घाटातून माघारी

खेड

संचारबंदीचे सारे नियम पायदळी तुडवत प्रेयसीला भेटण्यासाठी नवी मुंबई (पनवेल) येथून दुचाकीने गुहागरला निघालेल्या प्रियकराला खेड पोलिसांनी कशेडी टॅप येथे अडवून माघारी धाडले.
लॉकडाउनमुळे गुहागरमध्ये अडकून पडलेल्या प्रेयसीचा विरह सहन होत नसल्याने आपण ही जोखीम पत्करली, असे या प्रियकराने पोलिसांना सांगितले. 14 दिवस क्वारंटाईन करून ठेवण्याची तंबी देताच तो नाराज होऊन माघारी परतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातच थांबा, घराबाहेर पडू नका, असे पोलिस प्रशासन घसा फोडून सांगत आहे; मात्र या आवाहनाला आव्हान देत काही मजनू आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्याचे धाडस करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मजनूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लैलासह लांजा पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईन केले होते. ही बातमी ताजी असतानाच आज रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना गुहागरला प्रेयसीला भेटायला चाललेल्या पनवेल येथील मजनूला समज देऊन परत पाठवावे लागले. खेड पोलिस कशेडी टॅप येथे बंदोबस्तावर होते. पोलादपूरकडून रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी एक दुचाकी आली. पोलिसांनी विशेष परवान्याबाबत विचारणा केली. त्याने आपल्याकडे असा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली; तेव्हा आपण पनवेल येथून आलो असून आपल्याला गुहागरला जायचे आहे, असे त्याने सांगितले. गुहागरला जाण्याचे कारण पोलिसांना आश्‍चर्यचकित करणारे होते.

क्वारंटाईनची मात्रा पडली लागू
लॉकडाउनमुळे प्रेयसी गुहागरमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस तिला पाहता, भेटता आलेले नाही. लॉकडाउन 3 मे रोजी संपेल असे वाटले होते; मात्र 17 मे पर्यंत वाढले. विरह सहन होण्यापलीकडचा असल्याने मी तिला भेटण्यासाठी गुहागरला निघालो आहे, असे त्याने सांगितले. त्यावर पोलिसांना काय करावे हे कळेनासे झाले. त्याला जिल्ह्यात प्रवेश करण्यास नकार दिला. तो ऐकेना झाल्याने पोलिसांनी त्याला 14 दिवस क्वारंटाईन करण्याची तंबी दिली. ही मात्रा अखेर लागू पडली. प्रियकर हिरमुसला होऊन माघारी फिरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com