Maharashtra: 36 लाख विद्यार्थ्यांना मिळणार '2 गणवेश';216 कोटी रुपयांचा निधी मंजूर

शाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेश खरेदीबाबत निर्णय घेतल्यानंतर यामध्ये वरिष्ठ पातळीवर कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही.
विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणार.
विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणार. Dainik Gomantak

मुंबई: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत येणाऱ्या (samagra shiksha scheme maharashtra) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद,(ZP) नगरपालिका व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे (Covid 19)शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना(Student) प्रत्येकी एकच गणवेश मंजूर करण्यात आला होता. या वर्षी मात्र समग्र शिक्षा अभियाना मार्फत विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणार आहेत. या गणवेशांचा निधी मंजूर झाला आहे. विधार्थीना गणवेश देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने खरेदी बाबत सूचना केल्या आहेत. .

यामध्ये 36 लाख विद्यार्थ्यांचा लाभ:

जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती-जमाती, संवार्गातील मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांना गणवेश वाटप होईल. यामध्ये राज्यातील एकूण 36 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा (scheme)लाभ होईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी 600 रुपयां पर्यंत चा निधी मंजूर केला आहे. अशा प्रकारे 36 लाख विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी एकूण 216 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणार.
कोरोनासाठी ‘डब्ल्यूएचओ’ची नियमावली: शालेय विद्यार्थ्यांना मास्क लावण्याची सूचना

विद्यार्थ्याच्या खात्यात पैसे नाहीत:

याआधी गणवेशाची ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक (Bank)खात्यात जमा होत असे. मात्र यावेळी यामध्ये बदल होऊन याची जबाबदारी शाळा(school) व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने गणवेश खरेदीबाबतच्या सूचना समग्र शिक्षा अभियानाला देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक जिल्ह्यांना मंजूर निधी मिळाल्यानंतर जिल्हा परिषदांनी हा निधी थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात 15 दिवसांत जमा करावयाचा आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप:

शाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेश(Uniform) खरेदीबाबत निर्णय घेतल्यानंतर यामध्ये वरिष्ठ पातळीवर कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. अशा सूचना करण्यात आले आहे. यामुळे शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून होणारा मोठा हस्तक्षेप आता मात्र थांबेल, अशी आशा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com