मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेच मुख्य आरोपी - महाराष्ट्र एटीएस  

Sachin Vaze
Sachin Vaze

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे हे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येमध्ये सामील असल्याचे म्हणत, त्यांच्या कोठडीची न्यायालयात मागणी करणार असल्याचे सांगितले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारच्या संदर्भात मुंबई पोलीस दलातील पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. व त्यानंतर सचिन वाझे यांना मुंबईच्या कोर्टाने 25 मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावली होती. (The Maharashtra ATS said that Sachin Waze was the main accused in the Mansukh Hiren case)

आज महाराष्ट्राच्या एटीएसचे प्रमुख जयजितसिंग यांनी पत्रकार परिषद घेत, सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात मागणी करणार असल्याचे सांगितले. शिवाय यापूर्वी मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात हाय-एंड कार जब्त केली असल्याचे सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र एटीएसने महाराष्ट्रातील नोंदणी असलेली व्हॉल्वो कार जप्त केली आहे. मात्र या कारचा मालक कोण आहे याची स्पष्टता अजूनही नसल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले. 

सोमवारी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या मृत्यू प्रकरणी ठाणे एटीएसने आरोपी विनायक शिंदेला घटनास्थळी नेत तपास केला होता. याच ठिकाणी 5 मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. शिवाय मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात मुख्य सूत्रधार सचिन वाझेच असल्याची माहिती विनायक शिंदेने दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. विनायक शिंदे हा आधीच दोषी कैदी आहे. बनावट चकमकी प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आणि सध्या तो पॅरोलवर बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. 

याशिवाय, सचिन वाझे सोबत यापूर्वीच काम केले असल्यामुळे वाजे यांनी त्याला मनसुख प्रकरणातही आपला साथीदार बनवले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. विनायक शिंदे समवेत एका बुकीला देखील महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझेला ताब्यात घेतल्यानंतर एटीएस विनायक शिंदे आणि सचिन वाझे यांची एकत्रित चौकशी करणार आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com