मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; दोघांना घेतले ताब्यात  

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 मार्च 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या संशयित कारचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूसंबंधित महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या संशयित कारचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूसंबंधित महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने दोन जणांना अटक केली असल्याचे समजते. निलंबित पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धारे यांना अटक करण्यात एटीएसने सांगितले आहे. तर यापूर्वी ठाण्यातील व्यापारी असलेले मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. (Maharashtra ATS takes major action in Mansukh Hiren case)

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणावरून राज ठाकरेंचा घणाघात 

मुंबईत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्यानंतर त्याच्या काही दिवसांनीच मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अंबानींचे निवासस्थान 'अँटिलीया' बाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या संबंधित तपास एनआयए करत आहे. आणि यासंदर्भात मुंबई पोलीस दलातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाजे यांना एनआयएने अटक केली आहे. याशिवाय, गृह मंत्रालयाने मनसुख हिरेन संबंधित तपास देखील  एनआयएकडे सोपविला आहे. तर महाराष्ट्र एटीएस देखील या बाबतीत समांतर तपास करत आहे.

दरम्यान, अँटिलीया आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने याअगोदर मोठा निर्णय घेत मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली केली होती. व त्यानंतर हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी राज्यसरकारने आपली नियुक्ती केल्याची माहिती यानंतर पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले असल्याचा खुलासा या पत्रात केला आहे. 

तर, परमबीर सिंग यांच्या आरोपावर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उत्तर देताना, अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचा थेट संबंध येत असल्याचे म्हटले आहे. तसेच परमबीर सिंग यांना याचे कनेक्शन आपल्यापर्यंत पोहचतील अशी भीती वाटत असल्यामुळेच त्यांनी आपल्यावर आरोप केले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.   

संबंधित बातम्या