महाराष्ट्र बंद : ''शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्यांना हा केवळ ढोंगीपणाच वाटणार''

फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा केवळ ढोंगीपणाच वाटणार असं म्हटले आहे.
Nana Patole & Devendra Fadnavis
Nana Patole & Devendra FadnavisDainik Gomantak

लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारण्यात आला. या बंदला मात्र राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहेत. तर मात्र राज्यातील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपकडून (BJP) या महाराष्ट्र बंदवरुन ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. ''हा बंद हा फक्त ढोंगीपणा आहे,'' म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा केवळ ढोंगीपणाच वाटणार असं म्हटले आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारकडून (Thackeray government) पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मुंबईमध्ये पत्रकारपरिषेद बोलताना सांगितले की, महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्र बंद उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. मात्र भाजपने ज्या पध्दतीने या महाराष्ट्र बंदला विरोध केला, खऱ्या अर्थाने लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या त्या घटनेचे, या देशाच्या बळीराजावर गाडी चालवून त्यांना जीवे मारणं, या पध्दतीच्या हत्यारी व्यवस्थेला महाराष्ट्र भाजप समर्थन करत आहे, तर ही बाब योग्य नाही. म्हणून आज ज्या पध्दतीने राज्यातील भाजपा अध्यक्षांनी या महाराष्ट्र बंदला विरोध केला. त्याचाही आम्ही निषेध करतो. महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशच्या भाजप अध्यक्षांनी लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. परंतु राज्यातील भाजपाचे नेतेमंडळी ज्या पध्दतीने देशातील शेतकरी आंदोलनाचा विरोध करत होते. यामधूनच भाजपचे धोरण हे शेतकऱ्यांचे विरोधी असल्याचे स्पष्ट होते. आज पुकारण्यात आलेला बंद हा चांगल्या पध्दतीने आणि शांततेत झालेला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने आपले समर्थन दिले. राज्यातील जनता ठाकरे सरकारच्या बरोबर आहे, हे देखील या बंदच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. मात्र भाजप जाणीवपूर्वक राज्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे आज आपल्याला पूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळत आहे.

Nana Patole & Devendra Fadnavis
आजचा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस; देवेंद्र फडणवीसांचं टिकास्त्र

तसेच, 'भाजपने महाराष्ट्र बंद अयशस्वी झाला असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी स्पष्ट केले की, रस्त्यावर ते उतरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना रस्त्यावर काय घडत आहे याची सूतराम कल्पना नाही. रस्त्यावर ज्यावेळी लोकं महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत होते, ते त्यांनी पाहिले नसेल म्हणून अशा पध्दतीने राज्य भाजपकडून केले जात आहे. शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्याला हा केवळ ढोंगीपणाच वाटेल. कारण की, राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपचा धंदाच बनला आहे. मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मताना डावलून केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे करणे, आणि त्यानंतर शेतकरी हितासाठी जे कोणी लढण्यासाठी रस्त्यावर उतरेल त्यांच्यासाठी तो ढोंगीपणाच असतो. त्याचबरोबर आपण पाहिले असेल, शेतकरी नेते राकेश टिकैत यांना दहशतवादी, नक्षलवादी म्हणून राज्य भाजप आणि केंद्र सरकारमधील बडे बडे नेते हिनवत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढण्यासाठी उतरेल त्यांना ढोंगी म्हणून घोषित करणे हे भाजपचे धोरणचं राहिले आहे. त्यामुळे जो कोणी शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढेल त्यांना थेट भाजपकडून दहशवादी घोषित करण्यात येते,' अस म्हणत पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com