आता महाराष्ट्रातही जुळले टूलकिटचे धागेदोरो; बीडचा संशयित तरूण फरार!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

पण आता  ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात जुळले असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई देशात शेतकरी आंदोनल सुरू असतांना काही विदेशी कलाकारांनी आणि कार्यकर्त्यांनी ट्विट करून शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. त्याच ट्विट प्रकरणाबाबत पोलिसांनी दिशा रवी ला अटक केली आहे. त्याचबरोबर ग्रेटा थनबर्गचा सुध्दा या टूलकिट प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण आता  ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात जुळले असल्याचे पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्रातील बीडच्या शंतनु मुळुक या तरुणाचे नाव पुढे आणले आहे. शंतनु राहात असलेल्या बीडच्या घराचा तपास करण्यासाठी पोलीस पोहोचले आहेत.सध्या शंतनु फरार असून, त्याच्या आई वडिलांची चौकशी पोलीस करत आहेत. बीडच्या चाणक्यपुरीमध्ये हो तरूण राहतो.  शंतनुने बनवलेल ते ‘गुगल टूलकिट’ आणखी दोघांनी एडिट केल्याचा आरोप आहे. शनिवारी झालेल्या दिशा रवीच्या अटकेनंतर आता या टूलकिट प्रकरणात अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. आणि महाराष्ट्राचा सुध्दा संबध जोडला जात आहे.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या तसेच सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या निकिता जेकब यांचे ही नाव पुढे आले आहे. त्यासंदर्भात निकिता विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. सोशल मिडियावर व्हायरल केले गेलेले ते गुगल टूलकिट बनवण्यात निकिताचाही हात असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणात 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक झाल्यानंतर टुलकिटचे महाराष्ट्रातही कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. दिशाने पसरवलेले टुलकीट ग्रेटा थनबर्गने आपल्या सोशल मीडियाच्या ट्विटर अकांउंटवरून शेअर करुन नंतर ते डिलीट केले होते. तिच्या अटकेने देशभरातील वातावरण तापले आहे आणि या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले असून, काँग्रेससह शेतकरी आंदोलकांनी आणि काही विरोधी पक्षनेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

 

संबंधित बातम्या