प्रसिध्द गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

प्रसिध्द गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
Maharashtra Bhushan Award announced for famous singer Asha Bhosale

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला जाणार याची चर्चा असतानाच आज अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे.

आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्य़ा अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे उपमुख्य़मंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्यासह शासकिय अशासकिय सदस्य सहभागी होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांनी निवडीनंतर जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे अभिनंदन केले. (Maharashtra Bhushan Award announced for famous singer Asha Bhosale)

'केव्हा तरी पहाट, मी मज हरपून बसले गं., मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजुन' ही गीते कविवर्य सुरेश भट यांनी लिहिली आहेत तर आशाताईंचा स्वर लाभलेली गाणी आजही प्रसिध्द आहेत.  
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com