Maharashtra Board Exam Date 2021: 20 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार बोर्डाच्या परीक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

10 वी आणि 12वीच्या परीक्षांच वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.  22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सूचनांनुसार हे नवे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाच वोढते रूग्ण बघायला मिळत आहे. कोरोनाचं संकट वाढतच आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा आणि कॉलेजही काही प्रमाणात बंद आहेत. अशातच काल 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सूचनांनुसार हे नवे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

20 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार 10वीची परीक्षा

जाहीर झालेल्या नव्या वेळापत्रकानुसार 10 बोर्डाची वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 बोर्डाची वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार असल्याचे राज्याच्या शिक्षण बोर्डाने सांगितले आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ शैक्षणिक विभागीय मंडळांमार्फत इयत्ता10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाकडून कोविड नियमांचे पालन करण्याच्या सुचना

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी नियमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून 10वी आणि 12वीच्या परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका

बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून छापील स्वरुपात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. विद्यार्थ्यांनी छापील पत्रकावरून परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी. त्याचप्रमाणे अन्य संकेतस्थळावर किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले त्याचबरोबर व्हॉट्सअप किंवा अन्य सोशल मिडिया माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

राज्यात दिवसेंदिवस शाळेतील 9 वी 12 वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. 18 जानेवारी 2021 पासून 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर 21 हजार 287 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेत एका दिवशी फक्त 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती

 

संबंधित बातम्या