महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; दहावीच्या परिक्षा रद्द!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 एप्रिल 2021

कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असताना सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परिक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारला देखील त्यासंदर्भात विचारणा केली जाऊ लागली होती. दहावी, बारावीच्या परिक्षा ठरलेल्या तारखेवरुन पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड  यांनी जाहीर केला होता. मात्र कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Maharashtra Cabinet is a big decision 10th exam canceled)

यासंदर्भात बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहीती दिली. मात्र बारावीच्या परिक्षा होणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यामध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला असून काही तासामध्येच यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा 'पुतण्या' का आला चर्चेत? जाणून घ्या काय आहे...

‘’राज्यात दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करुन विद्यार्थ्यांचं मूल्याकंन कशाप्रकारे करता येईल तसेच केंद्र सरकारच्या यासंबंधीच्या काय मार्गदर्शक सूचना असतील याचाही विचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,’’ अशी माहीती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
 

संबंधित बातम्या