Maharashtra Cabinet Expansion| maharashtra
Maharashtra Cabinet Expansion| maharashtraDainik Gomantak

Maharashtra Cabinet Expansion: राज्यात पहिल्यांदाच 40 दिवसांत झाला मंत्रिमंडळ विस्तार

महाराष्ट्रात तब्बल 40 दिवसांनी सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होउन शपथविधी पार पडला आहे. राज्यात सरकार स्थापन होऊन 40 दिवसांनंतर हा विस्तार झाला आहे. राज्यात मंत्रिमंडळ नसल्यामुळे विरोधी पक्षांकडून शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात होता. शिंदे आणि फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतली होती. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असताना यापूर्वीही असे घडले आहे.

शिवसेना, कॉग्रेस आणि एनसीपी यांनी 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. तेव्हा महाराष्ट्रात 32 दिवस मंत्रिमंडळ नव्हते. तब्बल 32 दिवसांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची घोषणा केली. त्यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, नंतर राष्ट्रवादीने पाठिंबा नाकारला आणि काही दिवसांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली.

Maharashtra Cabinet Expansion| maharashtra
Maharashtra Cabinet Expansion: अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार,'या' नेत्यांना मिळाली संधी

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये असे घडले
2019 मध्येच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 24 दिवस मंत्र्यांशिवाय सरकार चालवले. एवढेच नाही तर या काळात त्यांनी चार कॅबिनेट बैठका घेतल्या. यामध्ये ते एकमेव मंत्री उपस्थित होते. याशिवाय 2018 साली तेलंगणामध्ये 13 डिसेंबर 2018 ते 18 फेब्रुवारी 2019 म्हणजेच 68 दिवस सर्वात लहान मंत्रिमंडळ होते. या काळात राज्य मंत्रिमंडळात केवळ 2 सदस्य होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com