Maharashtra: राज्यातील नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी 1200 कोटींच्या निधीची मागणी

नक्षलग्रस्त भागांचा आणि त्यांच्या विकासाकरीता राज्याला 1200 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
Maharashtra: राज्यातील नक्षलग्रस्त भागांच्या  विकासासाठी 1200 कोटींच्या निधीची मागणी
Maharashtra: राज्यातील नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी 1200 कोटींच्या निधीची मागणी Twitter /Office of Uddhav Thackeray

महाराष्ट्रात नक्षलग्रस्त भागांचा विकास आणि नक्षलवादी लोकांशी दोन हात करण्यासाठी राज्याला 1200 किती रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाहांकडे केली.बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आढावा घेण्याकरीता सांगितले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याची मांडणी गृहमंत्र्यांसमोर मांडली.

याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागात शाळा कशा वाढतील, या भागात सुरक्षा आणि पोलिस यंत्रणांना काम करतांना अनेकदा नेटवर्कच्या समस्याचा सामना कारवया लागतो. त्यासाठी या भागात मोबाइल टॉवर्स उभारण्याची गरज आहे. या दोन गोष्टींमुळे या भागांचा विकास होऊ शकतो. असे मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीमध्ये राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक उपस्थित होते.

Maharashtra: राज्यातील नक्षलग्रस्त भागांच्या  विकासासाठी 1200 कोटींच्या निधीची मागणी
राज्यातील वीज कंपन्यांना 'शॉक', 74 हजार कोटींची थकबाकी

दरम्यान, सध्या राज्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या अधिक दिसून येत आहे. ही समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. अशी भीती गुप्तचरांनी केली आहे. या मुद्यावर केंद्र आणि राज्यांनी मिळून काम करणे आवश्यक आहे . या विषयावर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले होते. या बैठकीत देशातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाहां या दोघांमध्ये 2019 नंतर दुरावा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आज अनेक दिवसांनी हे दोघे बैठकीच्या निमिताने दिल्लीत एकत्र आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com