11 ऑक्टोबरला लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 'महाराष्ट्र बंद'
Maharashtra Dainik Gomantak

11 ऑक्टोबरला लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 'महाराष्ट्र बंद'

लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ ही बंदची हाक देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ ही बंदची हाक देण्यात आली आहे. आज पार पडलेल्या आघाडी सरकारच्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली आहे. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद राहणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गाडीने आंदोलनात सामील झालेल्या शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा (Union Minister of State Ajay Mishra) यांच्यावर करण्यात येत आहे. सोमवारपासून कॉंग्रेससह विरोधी पक्षाचे नेते लखीमपूर खेरी येथे जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र योगी सरकारविरोधी (Yogi government) या नेत्यांना तेथे जाण्यास परवानगी देत नव्हते. दरम्यान काल यासंदर्भामध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

Maharashtra
'मला माझा मतदार संघच नाही, महाराष्ट्र हाच माझा मतदार संघ': मुख्यमंत्री

शिवाय, उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये ज्या भरधाव गाडीने शेतकऱ्यांना चिरडले ती गाडी आमचीच असल्याची कबुली केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. माझा मुलगा घटनास्थळी असल्याचा पुरावा दाखवून द्या, मी लगेच माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देतो, अशी भूमिकाही अजय मिश्रा यांनी घेतली आहे.

Related Stories

No stories found.