महाराष्ट्र काँग्रेस सूत्रे नाना पटोले यांच्या हाती

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

भाजपमधून  कॉंग्रेसमध्ये  प्रवेश केलेले  जेष्ठ  नेते  नाना  पटोले  यांच्या  हाती  महाराष्ट्र  कॉंगेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे  देण्यात आली आहेत.

मुंबई: महाराष्ट्र  कॉंग्रेसच्या सत्ता  राजकारणात मोठा  बदल  करण्यात आले आहेत. भाजपमधून  कॉंग्रेसमध्ये  प्रवेश केलेले  जेष्ठ  नेते  नाना  पटोले  यांच्या  हाती  महाराष्ट्र  कॉंगेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे  देण्यात आली आहेत. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष  पदाच्या चर्चेला  उधान आलं  होतं. मात्र  या  चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. नाना पटेले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा  दिल्यानंतर  महाराष्ट्र  कॉंग्रेस  अध्यक्ष पदाच्या नावासाठी त्य़ांच्या  नावाची  चर्चा  चालू  झाली  होती.

पंतप्रधान  मोदी  यांच्या  पहिल्या  कार्यकाळात  नाना  पटोले  यांनी  भंडारा- गोदिंया लोकसभा  मतदार  संघातून  भाजपच्या  तिकीटावर  निवडून गेले  होते. मात्र  मोदींच्या कार्यपध्दतीवर  टिका  करत  नाना  पटोले  यांनी  पुन्हा  कॉंग्रेसमध्ये  प्रवेश  केला  होता. राज्यात  महाविकास  आघाडीचे  सरकार  स्थापन  झाल्यानंतर  त्यांना  महाराष्ट्र  विधानसभा अध्यक्ष  पदाची  सूत्रे  त्यांच्या हाती  देण्यात आली  होती.

मराठा आरक्षण : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; स्थगिती उठणार का याकडे...

मागच्या  काही  दिवसांपासून महाराष्ट्र  कॉंग्रेस  पदासाठी  कोणाची  निवड  करण्यात  येणार याची चर्चा होती. तसेच  कॉंग्रेस  पक्ष  नव्या नेतृत्वाच्या  शोधात  होता . मात्र अखेर  महाराष्ट्र  कॉंग्रेसला  नाना  पटोलेंच्या  रुपाने नवा अध्यक्ष  मिळाले आहेत. तसेच  नानांना  मदत  करण्यासाठी  नव्या सहा  कार्यकारी  अध्यक्षांची  निवड  करण्यात आली आहे. यात  शिवाजीराव मोघे, नसीम खान, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात कॉंग्रेला उर्जितावस्था आणण्यासाठी नवे बदल करण्यात आले आहेत. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात तसेच देशात नव्या बदलासहीत कॉंग्रेस पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे.       

संबंधित बातम्या