पंतप्रधान मोदींविरोधात कॉंग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, तक्रार दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते शेख हुसेन यांच्याविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात कॉंग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, तक्रार दाखल
PM Narendra ModiDainik Gomantak

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते शेख हुसेन यांच्याविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजप नेत्यांनी हुसैन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 48 तासांच्या आत हुसेन यांना अटक करा नाही तर आंदोलन करु, असे भाजपने म्हटले आहे. (Maharashtra Congress leader Sheikh Hussain comments against PM Narendra Modi protesting against ED in Nagpur)

वृत्तानुसार, काँग्रेस (Congress) नेते शेख हुसैन आणि माजी शहराध्यक्ष 13 जून रोजी ईडीविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले. “जैसे कुत्ते की मौत होती है वैसे नरेंद्र मोदी की मौत होगी”, केंद्रीय तपास संस्थेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या चौकशीच्या निषेधार्थ नागपुरातील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करताना ते म्हणाले.

PM Narendra Modi
'काँग्रेस अध्यक्ष पद कुणा एकाचा दैवी अधिकार नाही', राहुल गांधीं पुन्हा प्रशांत किशोरांच्या टार्गेटवर

दरम्यान, विदर्भातील काही काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी केंद्र सरकारविरोधात निदर्शनं करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा (Money laundering) आरोप करत राहुल गांधींची (Rahul Gandhi) ईडीकडून चौकशी सुरु आहे, नागपूर पोलिसांनी काँग्रेस नेते नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना आंदोलनावेळी ताब्यातही घेतलं होतं.

तसेच, भाजपकडून काँग्रेस नेते हुसेन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यात हुसेन यांना पंतप्रधानांविरोधात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. तसंच मोदींविरोधात अशी चुकीची भाषा वापरणं योग्य नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळाने हुसेन यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यात प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, सुधाकर देशमुख अनिल सोले, आणि मिलिंद माने यांनी हुसेन यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

PM Narendra Modi
"यह महाजुमलों की सरकार है..": राहुल गांधींनी घेतला मोदींच्या वक्तव्याचा समाचार

दुसरीकडे, महाविकास आघाडी पोलिसांवर तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकत आहे. पोलिसांनी हुसेन यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्हाला नाईलाजास्तव कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागतील, असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

PM Narendra Modi
काय आहे नॅशनल हेराल्डचे प्रकरण, ज्यात अडकले सोनिया गांधी अन् राहुल गांधी

शिवाय, राहुल गांधींवर ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. सुरुवातीला मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. यासोबतच दक्षिण मुंबईत नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांनी सीएसटी परिसरातून ईडीच्या कार्यालयावर मोर्चाही काढला. विरोधकांवर खोट्या केसेस दाखल करुन केंद्र सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com