Maharashtra: नागपुरात 11 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 9 आरोपींना अटक

नागपूर शहरापासून 60 किमी अंतरावर असलेल्या गावात 19 जून ते 15 जुलै दरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
Rape
RapeDainik Gomantak

Maharashtra Crime News: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड मद्ये एक धक्कादायक घटना घडली. काही नराधमांनी एका महिन्यात एका 11 वर्षीय मुलीवर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. उमरेड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि नऊ जणांना अटक केली. नागपूर शहरापासून 60 किमी अंतरावर असलेल्या गावात 19 जून ते 15 जुलै दरम्यान या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Rape
मासिक पाळीदरम्यान आदिवासी विद्यार्थीनीशी भेदभाव: वृक्षारोपण करण्यापासून रोखलं

रोशन करगावकर (29) आणि त्याचे मित्र/परिचित गजानन मुरस्कर (40), प्रेमदास गाठबांधे (37), राकेश महाकाळकर (24), गोविंदा नाटे (22), सौरभ उर्फ ​​करण रिठे (22) नितेश फुकट (30), प्रद्युम्न करूटकर (22) आणि निखिल उर्फ ​​पिंकू नरुळे (24) अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेचे आई-वडील मजूर असून, करगावकर हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहायचा. संबंधित कलमान्वये या आरोपिंवर गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करत आहेत.

19 जून रोजी रोशन कारगवार आणि त्याचा मित्र गजानन मुरस्कर यांनी शेजारी राहणाऱ्या पीडितेला काही घरगुती कामासाठी पैसे देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या घरी नेले. मात्र, नंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. शुभम दामडू नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. रोशन आणि त्याचा साथीदार बादल यांनी सोन्याच्या अंगठीवरून शुभमची हत्या केल्याचा आरोप होता. त्यांना अकोला रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Rape
Maharashtra OBC Reservation बाबत SC चा मोठा निर्णय, '365 ठिकाणी आरक्षणाविना निवडणुका'

रोशन आणि गजाननने मुलीवर बलात्कार केला. त्यांनी तिला धमकावून 300 रुपये देऊन गप्प बसवले. मुलीला ओळखणारा रोशन तिला अनेकवेळा घरी बोलवत असे. काही दिवसांपूर्वी गजानन आणि प्रेमदास तिला रोशनच्या घरी घेऊन गेले, तिथे इतर सात आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com