कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होणार

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी शिष्टमंडळात दिग्दर्शक, निर्मात्यांचा ही समावेश
Amit Deshmukh
Amit Deshmukh Dainik Gomantak

भारत यंदा 17 मे ते 28 मे या कालावधीत होत असणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहे. या चित्रपट महोत्सवात बॉलीवुडची मस्तानी 'दीपिका पदुकोण' ज्युरी म्हणून दिसणार आहे. असे करणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. या महोत्सवाला सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ महोत्सवात सहभागी होणार आहे.

Amit Deshmukh
Cannes Film Festival: फ्रान्समध्ये '53 व्या इफ्फी' च्या पोस्टरचे अनावरण

या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आज कान्स येथे पोहोचत आहे. या शिष्टमंडळात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे महाव्यवस्थपकीय संचालक विवेक भिमनवार, समन्वयक अशोक राणे, मनोज कदम तसेच या महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या 'कारखानीसांची वारी', 'पोटरा ' आणि ' तिचं शहर होणं ' या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, शंकर धोत्रे, समीर थोरात, सिध्दार्थ मिश्रा, रसिका आगाशे ही सहभागी होत आहेत.

जागतिक स्तरावरील चित्रपट निर्मिती आणि या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांना अनुभव घेता यावा आणि मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचावा यादृष्टीने या शिष्टमंडळात यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांना कान्स फिल्म फेस्टिवल मधील फिल्म मार्केट हे चांगले माध्यम आहे.

भारतीय चित्रपटाच्या उद्योगात आणि विशेषतः हिंदी चित्रपटांच्या निर्मितीत महाराष्ट्राचे स्थान अग्रस्थानी आहे. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीत उपलब्ध असल्याने सहाजिकच चित्रपट उद्योगाच्या वाढीत चित्रनगरीचे मोठे योगदान आहे. कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवात चित्रपट नगरीतील सुविधा आणि उपलब्ध असणारे विविध स्पॉट बद्दल सादरीकरण करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com