महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरात घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरात घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट
Ajit pawar

कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळी कोल्हापूरला (Kolhapur) न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची (Chhatrapati Shahu Maharaj) भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी संभाजीराजे यांचे भाऊ माजी आमदार मालोजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते.  महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्द पुन्हा तापलेला आहे. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, ते मराठा समाजासह आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या शाहू महाराजासोबतच्या या बैठकीत याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठा समाजाची 16 जून पसून पुन्हा आंदोलनाची हाक

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 6 जूनला शिवराज्याभिषेकानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणाबाबत आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 16 जून पासून कोल्हापूरातूनच या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मी संयमी आहे, पण सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहिला, त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही. असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने आता सरकारचे धाबे दणाणले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट असल्याचे समोर येत आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com