'NDRFच्या धरतीवर प्रत्येक जिल्ह्यात SDRF उभे करणार' - मुख्यमंत्री

सर्वांना भरपाई देणार असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव(Uddhav Thackeray) ठाकरे यांनी दिली आहे.
'NDRFच्या धरतीवर प्रत्येक जिल्ह्यात SDRF उभे करणार' - मुख्यमंत्री
Maharashtra Floods: Uddhav Thackeray in ChiplunTwitter@ANI

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आज चिपळूणमध्ये(Chiplun) दाखल झाले होते . चिपळूण व खेडमध्ये(Raigad) पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे.मुख्यमंत्र्यानी चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करत तिथल्या नागरिकांच्याही अडचणी समजून घेत मदतीचे आश्वासन दिले होते.(Maharashtra Floods)

यानंतर पत्रकार परिषद घेत सर्वांना भरपाई देणार असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच दोन दिवसात संपूर्ण आढावा घेऊन योग्य मदत जाहीर करू असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. आणि मदत करताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

मागील वर्षांपासून येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती पाहाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळून येथे मोठी घोषणा केली आहे. एनडीआरएफ पथकाच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पथकांची स्थापना केली जाणार आहे. ज्यामुळे आपतकालीन परिस्थितीमध्ये दुर्घटनास्थळावर तात्काळ मदत पोहचली जाईल.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Floods: Uddhav Thackeray in Chiplun
Maharashtra: उद्यापासून निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

राज्यात पावसाने घातलेले थैमान आणि पूरामुळे लोकांचे झालेले हाल हे विदारक दृष्य संपूर्ण देश २ दिवसांपासून पाहत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागांना पावसाने अक्षरश झोडपून काढले, कुठे दरड कोसळल्याच्या घटना घडल्या तर कुठे पूर आला आणि प्रशासन खडबडून जागे झाले. अनेक नेते, मंत्री, विरोधी पक्षनेते यांनी या भागात जाऊन भेटी दिल्या आणि लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुर्घटनाग्रस्त महाड मधल्या तळये गावात जाऊन "तुम्ही स्वतःला सावरा, बाकी आम्ही सांभाळू." असे आश्वासन दिले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com