Weather Update: गोव्यासह महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम; ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट पसरल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
Weather Update | Cold Wave in India
Weather Update | Cold Wave in IndiaDainik Gomantak

Weather Update: देशभरात  थंडीचा जोर कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं हुडहुडी वाढली आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. गोव्यासह (Goa) महाराष्ट्रातही 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.

तसेच विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. तसेच गोव्यात गेल्या वर्षात पहिल्यांदाच जानेवारी महिन्‍यात अशी स्थिती निर्माण झाली आहे अशी माहिती गोवा वेधशाळेचे शास्त्रज्ञ राहुल एम. यांनी दिली आहे.

गेल्या दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये हुडहुडी वाढली आहे. राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (India Meteorological Department) दर्शवला आहे.

पुढील दोन दिवस मुंबईसह (Mumbai) उत्तर कोकणातील काही भागांत थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरात सरासरी 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. 

Weather Update | Cold Wave in India
Aurangabad: धक्कादायक! औरंगाबादमध्ये 'एसीपी'ने काढली आपल्याच मित्राच्या पत्नीची छेड, गुन्हा दाखल

वाढत्या थंडीमुळे हरभरा पिकासाठी पोषक वातवरण तयार झाले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सध्या हरभरा पिकाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

राज्यात सामान्यतः विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड केली जाते. यंदा राज्यात सरासरीच्या 100 टक्के हरभऱ्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड झाली आहे. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे खरिपात कुठे अतिवृष्टीमुळं तर कुठे रोगाराईमुळे पिकांचे झालेल्या नुकसानामुळं शेतकरी हवालदील झाला होता. मात्र, आता हरभऱ्याची पिकाची स्थिती चांगली असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • गोव्यात दाट धुक्याची चादर!

राज्‍यात थंडी वाढल्यामुळे लोक उबदार कपडे परिधान करू लागले आहेत. ग्रामीण भागात तर शेकोटीचा वापर केला जातोय. तेथे सकाळचे 9 वाजले तरी धुके दाटलेले दिसून येत आहे.  गोवा वेधशाळेचे शास्त्रज्ञ एम. राहुल यांच्या मते, पुढील दोन-तीन दिवसांत किमान तापमानात आणखी 1 ते 2 अंशांनी घट होणार आहे. हवामानात किंवा ऋतुमानात बदल घडल्यावर स्वाभाविकपणे धुके दाटते.

पंरतु कालपासून जे धुके दाटत आहे, त्‍यास ‘रेडिएशन धुके’ संबोधतात. ज्यावेळी आर्द्रता 95 टक्क्यांवर जाते, त्यावेळी धुके दाटते. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढउतार होत आहे. आज सोमवारी पणजीत कमाल 30.4 अंश सेल्सिअस तर किमान 18.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com