मुंबईकरांसाठी खुशखबर.. 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सर्वांसाठी धावणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्यात येणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

मुंबई :  कोरोनामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वे बंद होण्याला दोन महिन्यांनी एक वर्ष पूर्ण होईल. पण आता ही लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्यात येणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाल्याने सर्वसामान्यांकडून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल,मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

राजेंचा इतिहास जगाला कळणार; शिवनेरी किल्ल्याचा विकास होणार

आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्यांसाठी ही लोकल सेवा सुरू झाली असली, तरी यासाठी वेळेची काही बंधने घालण्यात आली आहेत. ठरवून दिलेल्या वेळेतच सर्व प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार आहे. लोकलमधून प्रवास करण्यासाठी वेळेचे तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत.

 सर्वसामान्य नागरिकांना या वेळेत लोकल प्रवास करता येणार :

 सकाळी 7 च्या आत, दुपारी 12 ते 4 व रात्री 9 नंतर

या वेळेत लोकल प्रवास करता येणार नाही

सकाळी 7 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवास करता येणार नाही. या वेळांमध्ये केवळ विशिष्ट प्रवर्गातील व सरकारने परवानगी दिलेल्या नागरिकांनाच प्रवास करता येणार नाही.

किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरूद्ध निवडणुक आयुक्तांकडे तक्रार

काही दिवसांपूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून चालवण्यात येणाऱ्या 2781 लोकल सेवेत 29 जानेवारीपासून वाढ करून, 2985 लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

संबंधित बातम्या