महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा मराठा समाजाला दिलासा

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

मराठा समाजातील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई- मराठा समाजातील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा समाजातील उमेदवारांना शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी आरक्षण लागू व्हावे म्हणून ‘ईडब्लूएस’चे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ‘ईडब्लूएस’ आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल, उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा शासन सेवेत भरतीकरिता ‘ईडब्लूएस’ आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार ‘एसईबीसी’ आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही, ‘ईडब्लूएस’ प्रमाणपत्र देतांना ‘एसईबीसी’ उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता याआधारे राज्य शासनाने विहित केलेले निकष लावण्यात येतील.

हे आदेश सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष याचिका क्र. १५७३७/२०१९ व इतर याचिकांमधील अंतरिम आदेशावरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील, असेही मंत्रिमंडळाने स्पष्ट केले. 

 

संबंधित बातम्या