महाराष्ट्र सरकारचा इंटरेस्ट दारू विक्रीत!

Maharashtra Government
Maharashtra Government

चंद्रपुर: गुन्हेगारीत वाढ होण्याचे विचित्र तर्क देत महाराष्ट्र सरकारने चंद्रपुरात अनेक वर्षांपासून दारूवरील बंदी हटविली आहे. जिल्ह्यात बंदीमुळे गुन्हे वाढल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. फडणवीस सरकारने सन 2015 मध्ये जिल्ह्यात दारू बंदी लागू केली होती पण महाविकास आघाडी सरकारच्या विकासानंतरच दारूबंदी हटविण्याबाबत चर्चा सुरू झाली. अखेरीस, चंद्रपूरचे प्रभारी मंत्री आणि कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दारू बंदी उठविण्यात यश मिळविले आहे.(Maharashtra Government interested in sale of liquor)

ते म्हणाले की, "दारूबंदीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यापार सुरू झाला होता. तरुण दारू विक्रीच्या धंद्यात गुंतले होते, परिणामी जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे." त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचे दूरगामी परिणाम होतील. यावरून कोरोनाच्या या संकटात ठाकरे सरकारचे प्राधान्य काय आहे हे दिसून येते. राज्य सरकार आरोग्य यंत्रणेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा दारू विक्रीत अधिक रस घेत आहे, असे आता दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयावर विरोधी पक्ष टीका करू लागले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे त्याचा दूरमागी परिणामी आपल्याला लवकरच दिसतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

"महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाच्या या भयंकर काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देण्याचे सोडून महाविकास आघाडी सरकार कोणत्या गोष्टींना प्राथमिकता देतात हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच सरकारचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com