महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन हटवणार?  

महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन हटवणार?  
maharashtra unlock.jpg

मुंबई : कोविड 19 ( Covid 19) च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government)  कडक निर्बंधधासह लॉकडाऊन (Lockdown)  लागू केले आहे. आता या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येला काही प्रमाणात ब्रेक मिळाला आहे.  मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू केला आहे.  परंतु, आता महाविकास आघाडी सरकार  1 जूननंतर लॉकडाऊनचे  निर्बंध कमी करणार की हटवणार याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.   तर दुसरीकडे राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध  4 वेगवेगळ्या टप्प्यात उघडणार असल्याचे संकेत राज्यातील काही मंत्र्यांनी दिले आहे.  (Maharashtra government to remove lockdown?) 

कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होताच राज्य सरकार आता लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता आणण्याच्या विचारात असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. 30 जूनपर्यंत वेगवेगळ्या चार टप्प्यात निर्बंधामध्ये ही शिथिलता आणली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केले जाणार आहेत. तथापि,  राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यताही  आहे.  मात्र  तिसऱ्या लाटेचा परिणाम दुसर्‍या लाटेच्या तुलनेत कमी होईल. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष  करणे अधिक घाटाज ठरू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.   त्यामुळे लॉकडाऊन  पूर्णपणे हटवले जाणार नाही. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर नक्कीच त्यात बऱ्याच प्रमाणात शिथिलता आणली जाईल, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 

  • चार टप्प्यात कश्या प्रकारे शिथिलता आणली जाणार 

1.  पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते दुपारी दोन या दरम्यान दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. 
2.  दुसर्‍या टप्प्यात आणखी काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. दैनंदिन वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना  परवानगी दिली जाईल. 
3.  तिसर्‍या टप्प्यात काही निर्बंधासह हॉटेल्स, परमिट रूम, बिअर बार आणि दारूची दुकाने उघडली जाऊ शकतात. तथापि, हॉटेल 50 टक्के क्षमतेसह उघडण्यास परवानगी दिली जाईल. 
4.  चौथ्या टप्प्यात मुंबई स्थानिक आणि धार्मिक स्थळ (मंदिर) उघडले जाईल. यासह जिल्हाबंदीच्या निर्णयाला स्थगिती दिली जाऊ शकते. 

अंदाजानुसार,  ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. म्हणूनच, जर कोरोना संक्रमणाची संख्या वाढली आणि निर्धारित वेळेनुसार लसीकरण अंदाजित झाले नाही तर पुन्हा एकदा लॉकडाउन लागू होईल. तथापि, रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढल्यासच  निर्बंध पुन्हा लागू  केले जातील.  म्हणजेच, लॉकडाऊन याक्षणी पूर्णपणे संपुष्टात येणार नाही. तसेच,  लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी सर्व काही सकारात्मक असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्सच्या तज्ञांशी सल्लामसलत करून निर्बंध कमी करण्याचा विचार करू शकतात. परंतु सध्या तरी लॉकडाउन पूर्णपणे संपेल असा भ्रम ठेवू नये, असा इशाराही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com