महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, राज्यात लागू होणार 'मुख्यमंत्री किसान योजना'

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, राज्यात लागू होणार 'मुख्यमंत्री किसान योजना'

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) योजनेच्या धर्तीवर, राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' (CM Kisan Scheme) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या योजनेनुसार वर्षाकाठी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, राज्यात लागू होणार 'मुख्यमंत्री किसान योजना'
King Charles तृतीय ब्रिटनचे नवे सम्राट, ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार

प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षाला प्रत्येकी 6,000 रुपये दिले जातात. दोन हजार रुपये वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. त्याचधर्तीवर मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील लवकरच मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षात बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com