महाराष्ट्रात फुटला कोरोनाचा बॉम्ब; नवीन वर्षात सापडले सर्वाधिक रुग्ण  

दैनिक गोमन्तक
रविवार, 4 एप्रिल 2021

मुंबईत कोरोनाव्हायरसच्या नवीन घटनांनी सर्व विक्रम मोडले आहेत.

मुंबईत कोरोनाव्हायरसच्या नवीन घटनांनी सर्व विक्रम मोडले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई महानगरात आज 11,163 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासांत कोरोना विषाणूमुळे 25 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासह, महाराष्ट्राच्या राजधानीत कोरोनाची एकूण प्रकरणे आता 4 लाख 52,445 वर पोहोचली आहेत. तर, 3 लाख 71 हजार 628 जण हे कोरोनाच्या विळख्यातून पुन्हा सावरले आहेत. यासह मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्याही 68, 502 वर पोहोचली आहे. तेच आतापर्यंत फक्त मुंबईत 11,776 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. 

याशिवाय, महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या नव्या प्रकरणांनी मोठी मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. कारण महाराष्ट्रात आज कोरोनाची नवी 57,074 प्रकरणे समोर आली आहेत. तर मागील चोवीस तासात 222 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने कळस गाठल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 30,10,597 वर पोहचली आहे. त्यानंतर, 25,22,823 जण कोरोनाच्या संसर्गातून पुन्हा बरे झाले आहेत. आणि आतापर्यंत महाराष्ट्रात 55,878 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 'विकेंड लॉकडाउन' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा 'विकेंड लॉकडाउन' शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत राहणार 

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी म्हणून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रात सोमवार ते शुक्रवार पर्यन्त रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण कडक संचारबंदी राहणार आहे. तर तेच दिवसभरात राज्यात जमावबंदी राहणार असल्याचे समजते. शिवाय राज्यातील ही अंमलबजावणी उद्यापासून लागू होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.   

संबंधित बातम्या