महाराष्ट्र: अल्पवयीन, गर्भवती महिलांसाठी कोविड लस नाही

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

केंद्राच्या प्रोटोकॉलनुसार 18 वर्षांखालील  मुलांना आणि गर्भवती महिलांना“कोविशिल्ट” ही लस दिली जाणार नाही.

मुंबई: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी सांगितले की, केंद्राच्या प्रोटोकॉलनुसार 18 वर्षांखालील मुलांना आणि गर्भवती महिलांना “कोविशिल्ट” ही लस दिली जाणार नाही.

"नुवडक व्यक्तींना  दोन-डोस देण्याचे आम्ही ठरविले आहे, पहीला डोज आता आणि दुसरा डोज ४ते ५ आठवड्यानंतर देण्याचे आम्ही ठरविले आहे. १८वर्षांखालील व्यत्कींना आणि, गर्भवती महिलांना ही लस दिली जाणार नाही," असे  टोपे यांनी माध्यमांना सांगितले आहे.

ते म्हणाले, पुण्यातील उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) कडून आतापर्यंत महाराष्ट्राला अपेक्षित 17,50,000 डोसच्या 963,000 डोस प्राप्त झाले आहेत - जे राज्य सरकारच्या कोट्याच्या सुमारे 55 टक्के आहेत.

मंगळवारी रात्रीपासून या लस डोस मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अकोला, नागपूर व इतर ठिकाणी मुख्य आगारांतून राज्यभरात पाठविण्यात येत असून त्यानुसार ५११ नियुक्त लसीकरण केंद्रांना पुढील वितरण केले जाणार होते.

परंतु केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस देण्यात येणार आहे. कोविड १९ या साथीच्या आजाराने देशातील सर्वात जास्त नुकसान झाले असून आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक 11,200 मृतांची संख्या नोंदविली जात आहे. देशभरातील 72 लसीकरण केंद्रांचा यामध्ये  सिंहाचा वाटा आहे.

आणखी वाचा:

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट -

संबंधित बातम्या