Mumbai Suicide: मुंबईत दररोज 4 जण करतायेत आत्महत्या, तरुणांचा आकडा सर्वाधिक

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत दररोज 4 जण आत्महत्या करतात.
Suicide
Suicide Dainik Gomantak

Mumbai NCRB Suicide Data: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत दररोज 4 जण आत्महत्या करतात. गेल्या दोन वर्षांत आत्महत्यांच्या घटनांमध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, तज्ञांच्या मते, दररोज 80 प्रकरणे समोर येतात, ज्यामध्ये कोणीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. मुंबईत अनेक लोक बाहेरुन कामानिमित्त येतात.

मानसशास्त्रज्ञ दीप्ती पुराणिक यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'नैराश्यातून जाणारे बहुतेक लोक तरुण आहेत. सायबर बुलिंगमुळे अनेक रुग्ण त्रस्त आहेत. अशा लोकांशी संवाद साधण्याची गरज आहे.' एका कॉलेजमध्ये (College) प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या आलोक यांनी सांगितले की, 'तरुणांना त्यांच्या इमेजबद्दल खूप चिंता आहे. तसेच वर्गमित्रांचा दबाव, मानसिक तणाव, मित्रांसोबतचे मतभेद यामुळे अनेक तरुण आत्महत्येचा विचार करतात. तरुणांनी आपल्या प्रियजनांशी बोलत राहिले पाहिजे.'

Suicide
Amit Shah Mumbai Tour: गृहमंत्री शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सूरक्षा यत्रंणेचे दूर्लक्ष

MCRB डेटा

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या रिसर्चनुसार 2021 मध्ये एकूण 1 लाख 64 हजार 33 आत्महत्येच्या घटना पोलिस रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. 2017 मध्ये ही संख्या 1 लाख 29 हजार 887 (9.9%) होती, जी 2021 मध्ये वाढून 1,64,033 (12.0%) झाली आहे.

Suicide
Mumbai: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल मुंबईत, मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी महत्वाची चर्चा

महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या

देशात महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक 22 हजार 207 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

तामिळनाडू (Tamil Nadu) दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 14 हजार 966 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये 13 हजार 56 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com