'महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर लवकरच तोडगा निघावा'

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच माजी आमदार दिगंबर यशवंतराव पाटील (Digambar Yashwantrao Patil) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची भेट घेत त्यांना आपले निवेदन दिले.
'महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर लवकरच तोडगा निघावा'
महाराष्ट्र एकीकरण समितीDainik Gomantak

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न व्यवहारिकरित्या सोडविण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच माजी आमदार दिगंबर यशवंतराव पाटील (Digambar Yashwantrao Patil) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची भेट घेत त्यांना आपले निवेदन दिले. तसेच या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), सीमाभाग समन्वनयक मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.

 महाराष्ट्र एकीकरण समिती
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाविवाद एक संपलेला अध्याय

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांची भेट या शिष्टमंडळाला घेता आली नाही. परंतु त्यांचे नावाचे निवेदन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com