Maharashtra Lockdown: लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.

मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. वीकेंड लॉकडाऊनही लावण्यात आला आहे. मात्र कोरोना रुग्णवाढीला फारसा ब्रेक लागत नसल्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेता राज्य सरकारने लॉकडाऊन न लावता कडक निर्बंध लावले आहेत.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्यांना केले आहे. कोरोना लसीकरणासाठी नागरिक पहाटेपासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून तासंतास उभा असल्याचे पहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी लशीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस देखील उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. (Maharashtra Lockdown No lockdown but strict restrictions)

धक्कादायक! ऑक्सिजन अभावी मुंबईत 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन न लावता राज्यातील जनतेवर कडक निर्बंध लावले आहेत.  उद्या संध्याकाळपासून 15 दिवसांसाठी 144 लागू करण्यात आले आहे,अनावश्यक बाहेर पडण्यावर बंदी, आत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद, जीवनावश्यक सेवांसाठी सार्वजनिक सेवा सुरु (रुग्णालये, वैद्यकीय सेवा,  शीतगृहे, पावसाळ्यापूर्वीची काम, पत्रकार, पेट्रोल सेवा, खाजगी सुरक्षा सेवा मंडंळ सेवा सुरु राहणार) हॉटेल, रेस्टारंट सेवा बंद रस्त्यावरची खाद्य सेवा सुरु, पार्सल सेवा सुरु, पेट्रोल पंप कार्गो सेवा सुरु, शिवभोजन मोफत, सात कोटी नागरिकांना 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ,  पाच योजनांमधील 35 लाभार्थ्यांना आर्थिक मदत, अधिकृत फेरीवाल्यांसाठी 1500 रुपये निधी, परवानाधारक रिक्षाधारकांसाठी 1500 सहाय्य, नोंदणीकृत घरेलु कामगांरासाठी आर्थिक निधी, रुग्ण वाढत राहिल्यास ऑक्सीजन संपेल, रोज 40 ते 50 हजार रेमडेसिव्हीरची गरज आवश्यक आहे.

संबंधित बातम्या