मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या, कारण...

आईसमोर केली वडिलांची हत्या
maharashtra mentally unsound man put his father to death
maharashtra mentally unsound man put his father to deathDainik Gomantak

महाराष्ट्रातील पालघरमध्ये मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या वडिलांची हत्या केली आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली.आरोपीने वडिलांची हत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. (maharashtra mentally unsound man put his father to death)

maharashtra mentally unsound man put his father to death
IPL 2022|कॅमेरामनचे लक्ष मुलींवर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ही घटना शनिवारी पालघरच्या मोखाडा तालुक्यातील एका शेतात घडली. जिथे पांडू सावजी मोळवे नावाचे 70 वर्षीय वृद्ध काम करायचे. जेव्हा मोळवेची पत्नी शेतात जेवण घेऊन पोहोचली तेव्हा काशिनाथने मोळवेच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि त्याच्या वडिलांवर हल्ला केला. दरम्यान हल्ल्यात वडीलांचा जागीच मृत्यु झाला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोळवे यांच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिच्या मुलाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com