"बोबडं किरीट सोमय्या तर सारखं उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचीच चौकशी करा म्हणतंय"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

घरगुती वीज बिलात सवलत देण्याचा विचार करत असल्याचे सूतोवाच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

मुंबई- भाजपची नेते मंडळी सतत मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची बदनामी करत आहेत. ते बोबडं किरीट सोमय्या तर ठाकरे यांच्या संपत्तीचीच चौकशी करा असंच म्हणतंय, ती ठाकरे यांच्या पूर्वजांची संपत्ती आहे. याच्या बापाचं काय जातंय समजत नाही, अशी बोचरी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. घरगुती वीज बिलात सवलत देण्याचा विचार करत असल्याचे सूतोवाच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ पुढे बोलताना म्हणाले, ‘‘चंद्रकांत पाटील सतत शरद पवारांवर टीका करतात. ५० वर्षे शरद पवार कोणतीही निवडणूक हरलेले नाहीत. मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत अनेक पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. मात्र, ज्या दादांना दहा वर्षांत स्वत:चा मतदारसंघ तयार करता आला नाही. मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघ टिकवता आला नाही, ते आता पवारांवर टीका करत आहेत, अशी टीका त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. 

राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर लगेचच कोरोना महामारीने प्रवेश केला. त्याविरोधात राज्य सरकार धीराने लढत असून निधीचे स्त्रोत आटले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रतिमहिना 12 हजार 500 कोटी रूपये द्यावे लागतात. याउलट राज्याच्या तिजोरीत फक्त 3 हजार कोटी जमा होत असताना  9 हजार कोटींचे कर्ज घेऊन पगार केले जातात. शासनावर ६४ कोटींचे कर्ज झाले असून आरोग्यावरही मोठा खर्च केला जात आहे.  

संबंधित बातम्या