Mumbai Police कडून उडत्या कंदीलांच्या वापरावर 30 दिवस बंदी

Mumbai Alert: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांनी सतर्क झाले आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceDainik Gomantak

मुंबई पोलिसांनी सणासुदिच्या तोडांवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत कंदील (lanterns) उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. चायनीज फ्लाइंग कंदीलांच्या वापर आणि विक्री करण्यावर देखील 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईचे डीसीपी संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. आकाशात कंदील उडवल्याने लोकांच्या जीव धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

या महिन्याच्या 16 ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री 30 दिवसांसाठी बंदी आणली आहे. चायनीज कंदील म्हणून समजल्या जाणाऱ्या फ्लाइंग कंदीलांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू असेल. या आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत.

यासोबतच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी देखील घातली आहे. मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळाली आहे. याशिवाय मानवी जीवित आणि मालमत्तेचं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळं मुंबईत दंगल घडू नये आणि सार्वजनिक वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये, यासाठी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा हा आदेश 16 ऑक्टोबर 2022 ते 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू राहणार आहे.

Mumbai Police
Raut Writes to Mother: आई, मी नक्कीच परत येईन! संजय राऊत यांचे तुरूंगातून भावनिक पत्र

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अर्लट मोडवर

दिवाळी सण (Diwali Festival) अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपला आहे. यामुळे मुंबई पोलीस अर्लट मोडवर आले आहेत. फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 'डी' कंपनीशी संबंधित पाच जणांना मुंबई (Mumbai) पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली आहे. त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. यापूर्वी खंडणीच्या प्रकरणात गुंड छोटा शकीलचा मेहुणा, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि व्यापारी रियाझ भाटी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईत सणासुदीचा काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन अर्लट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com