नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'मनसे'कडून स्वबळाची रणनिती

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जानेवारी 2021

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी बघावयास मिळत आहे, त्यातच आता नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणनिती आखण्यासाठी सगळेच पक्ष सज्ज झाले आहेत.

नवी मुंबई : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी बघावयास मिळत आहे, त्यातच आता नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणनिती आखण्यासाठी सगळेच पक्ष सज्ज झाले आहेत. या निवडणूकीच्या रिंगणात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळाचं आवाहन कसं पेलणार, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईत मनसेच्या तीन शाखांचं उदघाटन झालं. यावेळी अमित ठाकरे हे पक्षाच्या कामांमध्ये लक्ष घालत आसल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. यावेळी अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी काळात आखण्यात येणाऱ्या रणनितीबद्दल चर्चा केली. 

तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि नव्या पिढीचा राजकारणातील सहभाग वाढवण्यासाठी राज  अमित ठाकरेंना पक्ष कामकाजात सहभागी करून घेण्यात येत आहे.  अमित ठाकरे यांचा चेहरा पक्षाच्या कामगिरासाठी महत्तवाचा ठरणार आसल्याच्या चर्चा आहेत.

संबंधित बातम्या