ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 'मनसे'ची झेप   

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल अंतिम टप्प्यात आहेत. तर काही ठिकाणच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये काही ठिकाणी सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि काही ठिकाणी संबंधित पक्षांनी आपापले गड राखल्याचे चित्र आहे. याशिवाय अन्य काही ग्रामपंचायतींमध्ये युती आणि आघाडी देखील झाल्याचे समोर येत आहे. त्याच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील काही ग्रामपंचायतींमध्ये आपला झेंडा फडकावला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल अंतिम टप्प्यात आहेत. तर काही ठिकाणच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये काही ठिकाणी सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि काही ठिकाणी संबंधित पक्षांनी आपापले गड राखल्याचे चित्र आहे. याशिवाय अन्य काही ग्रामपंचायतींमध्ये युती आणि आघाडी देखील झाल्याचे समोर येत आहे. त्याच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील काही ग्रामपंचायतींमध्ये आपला झेंडा फडकावला आहे. अहमदनगरच्या पाथर्डीतील शिरसाठवाडी मध्ये मनसेने दमदार विजय मिळवलेला आहे.  

मनसेने अंबरनाथ जिल्ह्यातील काकोळी ग्रामपंचायतीत शिवसेना आणि भाजपला चांगलाच झटका दिला आहे. काकोळी ग्रामपंचायतीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढत होते. मात्र या दोघांवर भारी पडत मनसेने सात पैकी चार जागांवर विजय मिळवला आहे. रेश्मा गायकर, सुरेखा गायकर, जयश्री गायकर आणि नरेश गायकर या मनसेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. 

त्यानंतर, बीड जिल्ह्यातील केजच्या नारेवाडी ग्रामपंचायतीत देखील मनसेने विजय मिळवलेला आहे. या ठिकाणी सात पैकी पाच जागा मनसेने आपल्या खिशात घातल्या आहेत. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरामध्ये जिगाव ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. येथील नऊ पैकी सात जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मध्ये मनसेने सर्वात मोठा विजय मिळवलेला आहे. शिरसाठवाडी येथे नऊ पैकी नऊ जागा मनसेने जिंकल्या आहेत.          

 

संबंधित बातम्या