महाराष्ट्रात 1278 नवीन रुग्ण

Dainik Gomantak
सोमवार, 11 मे 2020

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्‍लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1237 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून, आज एकूण 12,767 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून, त्यांनी 55.61लाखलोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

मुंबई

राज्यात आज 1278 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 22,171 झाली आहे.आज राज्यात रुग्ण दगावण्याचा उच्चांक झाला असून, एका दिवसात तब्बल 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा 832 झाला आहे.आज 399 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत एकूण 4199 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आज 53 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 19, पुण्यातील 5, जळगाव शहरात 5, धुळे शहरात 2, धुळे ग्रामीण भागात 1, पिंपरी चिंचवड मध्ये 1, अहमदनगरमध्ये 1, औरंगाबाद शहरात 1, नंदुरबारमध्ये 1, सोलापूर शहरात 1 तर वसई-विरारमध्ये 1 मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील 14 मृत्यू हे 27 एप्रिल ते 10 मे 2020 या कालावधीतील आहेत. त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेशमधील एक मृत्यू आज मुंबई येथे झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 33 पुरुष, तर 20 महिला आहेत. 53 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 19रुग्ण आहेत, तर 30 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 जण 40 वर्षांखालील आहेत. रुग्णांना असणा-या इतर आजारांबाबत 17 जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित 36 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये (75 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 832 झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2,38,766नमुन्यांपैकी 2,15,903 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 22,171 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्‍लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1237 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून, आज एकूण 12,767 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून, त्यांनी 55.61लाखलोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
आजपर्यंत राज्यातून 4199 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 2,44,327 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 14,465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या