मराठा आरक्षणाबाबत पुढील सुनावणी २८ रोजी

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

मराठा आरक्षणासंबंधीची सुनावणी ११ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी आज करण्यात आली. आता यावर २८ रोजी सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली: मराठा आरक्षणासंबंधीची सुनावणी ११ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी आज करण्यात आली. आता यावर २८ रोजी सुनावणी होणार आहे. 

महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली तर याचिकाकर्त्यांच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.रोहतगी यांनी बाजू मांडताना इंद्रा साहनी प्रकरणाचा दाखला दिला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरविले आहे व अनेक राज्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असतानाही केंद्राने दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा कायदा केला, या बाबींकडे लक्ष वेधले. इंद्रा साहनी प्रकरणी नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. त्यामुळे या संदर्भातील प्रश्नांची चर्चा करण्यासाठी मोठे खंडपीठ हवे, असा युक्तिवादही रोहतगी यांनी केला. 

संबंधित बातम्या