Maharashtra Political Crisis: 'मविआ'चा खेळ ओळखा..! एकनाथ शिंदेंचं शिवसैकांना आवाहन

हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हितासाठी समर्पित
Eknath Shinde News | Maharashtra Political News Updates
Eknath Shinde News | Maharashtra Political News UpdatesDainik Gomantak

नुकतंच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांना सज्जड देत, बंडखोरांनो तुम्हाला कधीच शिवसेनेइतका मान भाजप देणार नाही. तसेच बंडखोरांसमोर आता दोनच पर्याय राहीले आहेत. एक तर प्रहार संघटनेत प्रवेश करा अथवा भाजपला स्विकार करुन भाजपमध्ये जा पण यांना परत कधीच शिवसेनेत प्रवेश मिळणार नाही असे ते म्हणाले. असं असताना शिवसैनिकांना उद्देशून एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. (myfight is for rescuing sena from clutches of python of MVA says Eknath Shinde )

Eknath Shinde News | Maharashtra Political News Updates
बंडखोरांना प्रचाराला देखील बाहेर पडू देणार नाही - आदित्य ठाकरे

बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित करणारे हे ट्विट केले आहे. यात त्यांनी शिवसैनिकाला भावनिक साद घालती आहे ते म्हणाले की, 'नीट समजून घ्या, हा महाविकास आघाडीचा खेळ आहे.

तो ओळखा..! शिवसेना आणि शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी लढत आहे. असे ते म्हणाले आहेत. तसेच हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हितासाठी समर्पित आहे. असे ते म्हणालेत. त्यामूळे शिवसैनिक यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामूळे शिवसेनेचा हा अंतर्गत कलह आणखी किती वाढणार आहे. याबाबत सध्या तरी भाष्य करणे उचित ठरणार नाही.

भाजप नेत्याचं अजब विधान; सुशांतच्या दोषींना देवच शिक्षा करतो

कमी कालावधीत सिनेसृष्टीत अनेक यशशिखरे गाठणाऱ्या अभिनेता सुशांत सिंग याचा मृत्यू रहस्यमय मृत्यू झाला होता. या मृत्यूवरुन महाराष्ट्रासह संपुर्ण देशभर तर्क - वितर्क लावले जात होते. असे असताना भाजप प्रवक्त्याने महाराष्ट्र सरकारवर एक अजब विधान केले आहे. भाजप प्रवक्ते निखिल आनंद यांनी म्हटले आहे की, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या हत्येतील दोषींना वाचवण्यासाठी देव उद्धव ठाकरेंना शिक्षा देतो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com